संभाजी महाराज आणि गुढीपाडवा
मित्रांनो नमस्कार 🙏
सुप्रभात 💐💐💐
आजची सकाळ खास आहे.
आज चैत्र शुद्ध 1 शके 1938 अर्थात शक दिनदर्शिकेतील 1938 व्या वर्षातील पहीला दिवस! !!
मित्रांनो यात तिळमात्र शंका नाही की गुढीपाडवा हा सण केवळ महाराष्ट्रातच साजरा केला जातो आहे आणि यातही शंका नाही की शंभू राजांच्या बलिदानापुर्वीपासूनच हा सण अस्तित्वात आहे. हा हिंदू नव वर्षाचा पहीला दिवस, त्यामुळे नुतन वर्षारंभ दिन साजरा करायलाच हवा. पण हेही लक्षात घ्यायला हवे की एखाद्या सणाचे दिवशी आपल्या घरात एखादी दुखद घडली तर आपण तो सण साजरा करत नाही अथवा अगदी साधेपणाने साजरा करतो.
हिंदू धर्मच राहीला नसता तर आजचे धर्माभिमानीही राहीले नसते. मग ते ब्राह्मण असोत, संभाजी ब्रिगेड वाले असोत वा हिंदू धर्माचा अभिमान असणारे तुमच्या माझ्या सारखे सामान्य नागरिक असोत. बरे ज्यांनी धर्मासाठी बलिदान दिले त्यांच्या प्रती आपण एवढे कृतघ्न असावे का ? ?
ज्यांनी राजांना पकडून देण्यात मदत केली, त्यांना आपण पाठीशी घालावे का??? का म्हणून आपण आपली संस्कृती विसरावी ??? तर मला वाटते नाही. म्हणून मी यावर एक तोडगा 5-6 वर्षांपुर्वीच काढला आहे, गूढी ही आनंदाचे व विजयाचे प्रतीक आहे म्हणून मी वैयक्तिक माझ्या घरी, (लग्नानंतरचे घर) गूढी उभारत नाही पण नव्या वर्षाचे स्वागत माझ्या पद्धतीने करतो.
आंघोळ स्नान, औक्षण ,देवपूजा व दर्शन घेऊन मागील वर्षी झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागुन नविन वर्षासाठी देवाकडे आशिर्वाद मागतो, संकल्प करतो. यामुळे मला वाटते की मी माझी संस्कृतीही जोपासत आहे व शंभूराजेंविषयी कृतज्ञताही बाळगत आहे. त्यासाठी मी कोणावरही जबरदस्ती करत नाही. अगदी माझ्या आई - वडीलांवरही नाही.
मित्रांनो शके 1937 आपणास आनंदाचे गेले असेलच, नसेल गेले तर मागील वर्षी आलेले नकोसे अनुभव यापुढे कधीही न येवोत हीच जगदंबेचरणी प्रार्थना करतो. मागील वर्षी माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्यासाठी विनम्रपणे माफी मागतो आणि नव्या वर्षाच्या सर्वांना मनापासुन शुभेच्छा देतो.
आई जगदंबा आणि माळसाकांत खंडेराया आपणास नविन वर्षात अपार आनंद, सुख, समाधान, शांतता, प्रतिष्ठा, यश, समृद्धी व आरोग्य देवो हीच प्रार्थना.
नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपला : बालासाहेब सिताराम (बी. एस.)धुमाळ , बीड .

No comments:
Post a Comment