विचारांचा लढा का मुस्कटदाबी????
पुरोगामी महाराष्ट्रात आणखी किती बळी घेणार आहेत सनातनी? ????
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी कुठपर्यंत? ? आवाज दाबता नाही आला की कायमचाच आवाज बंद करणार? ?
वारे वा धर्म रक्षक! !! वारे वा हितचिंतक! !!
पुरोगामी राज्यात पुन्हा एक धमकी.....
"चौथ्या गोळीवर तुमचं नाव नको" कोल्हापुरातील ज्येष्ठ साहित्यिक सुभाष देसाईंना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सनातन धर्माला विरोध करु नका, अन्यथा तीन गोळ्यांनी ज्याप्रकारे अचूक वेध घेतला, तसं चौथ्या गोळीवर तुमचं नाव नको, अशी धमकी पत्रात देण्यात आली आहे.
तसंच भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या तृप्ती देसाई थोडक्यात बचावल्या, असा उल्लेखही या हितचिंतकाच्या पत्रात करण्यात आला आहे.
महालक्ष्मी ही महालक्ष्मी नसून अंबाबाई आहे. शिवाय ती शिवपत्नी आहे. विष्णूपत्नी नाही, असे तुमचे म्हणणे आहे, ते तुमच्या पुरतेच ठेवा. याला तुम्ही प्रबोधन वगैरे म्हणत असाल पण असले प्रबोधन करणाऱ्यांचा शेवट कोल्हापुरात कसा झाला हे सांगायला नको. साळोखे नगरातील घरी तुम्ही एकटेच असता. त्यामुळे आम्हाला तुमची काळजी वाटते. ऑफिसमध्येही जरा सांभाळून राहा, कारण आजूबाजूचे लोकही मदत करतील असे वाटत नाही. सनातन धर्माला, सनातन परंपरेला आणि पुरोहितांना विरोध करु नका. आमच्या तीन गोळ्यांनी अचूक वेध घेतलाय. चौथ्या गोळीवर स्वत:चे नाव लिहून घेण्याचा अट्टाहास सोडा. नशिबाने एक देसाई वाचली, दुसऱ्या देसाईचे नशिब साथ देईलच असे नाही.
एक हितचिंतक......
व्वा रे हितचिंतक! !!!
अहो, विचारांची लढाई विचारांनी लढायची असते. मतांबाबत भिन्नता असते आणि असावीही, मात्र त्यात लवचिकताही असावी, प्रथा अयोग्य व तर्कविसंगत असेल तर बदल करून घेण्याची मानसिकता असायला हवी. माझे ते खरे म्हणण्याऐवजी खरे ते माझे म्हणण्याची आपली रित आहे. .. बालासाहेब धुमाळ

No comments:
Post a Comment