नाक नाही नथीला.....
माणसाला पंचज्ञानेंद्रिये आहेत अर्थात पाच सेंस आॅर्गंस. पाच सेंस - दृष्टी, गंध, चव, श्रवण आणि स्पर्श. सहावा काॅमन सेंस! आणि ज्याला तो नसेल तो????? हं , नाॅनसेंस...
त्यापैकी एक नाक. ..
ग्रामीण महाराष्ट्रामध्ये अत्यंत जूनी म्हण आहे, 'नाक नाही नथीला अन भोक पाड भितीला'. म्हणीचा अर्थ सर्वांनाच माहीत आहे. या शिवायही अनेक म्हणी व वाक्यप्रचारात नाकाने आपला ठसा उमटविला आहे! नाक हे केवळ नथीसाठीच असत नाही. असे असते तर पुरूषांना नाकच नसते! ! आता नाक नसण्याचा अर्थ काढत बसु नका...
नाक, एक ठसठशित अवयव, त्याला कधी अत्यंत सन्मानाने तर कधी अत्यंत उपहासाने पाहीले जाते. नाक, ज्याच्यावरून व्यक्तीचे सौंदर्य, चारित्र्य व प्रतिष्ठा ठरवली जाते तो मानवी शरीराचा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. मानवी शरीराचे नाक आहे नाक!! या नाकाचा उपयोग मुलतः श्वासाद्वारे आॅक्सीजन घेण्यासाठी व उच्छवासाद्वारे कार्बन डाय आॅक्साईड सोडून देण्यासाठी होतो. याशिवाय त्याचा उपयोग होतो तो गंध ज्ञानासाठी. Human being can detect atleast one trillion distinct scents. म्हणजे मनुष्य प्राणी किमान एक ट्रिलियन प्रकारचे गंध ओळखु शकतो. आता ट्रिलियन म्हणजे एकावर बारा शुन्ये!!! म्हणजे किती ते तुम्हीच तपासा...
आणखीही काही वैशिष्ट्ये आहेत आपल्या या गंधज्ञान क्षमतेची व नाकाची!! मानवी गंधपेशींचे दर 30 ते 60 दिवसांनी नुतनीकरण होते. आपण भिती व निराशा देखील गंध करू शकतो! गंधज्ञान हे सर्वात पहीले ज्ञान आपण घेतो. माणसाचे नाक शरिराच्या तापमानाचे संतुलन राखते. थंडीत व उष्णतेत नाक ओले होते. गंधक्षमता पुरूषांपेक्षा स्त्रीयांची अधिक तिक्ष्ण असते!! वासावरून नवरोबाने लावलेले दिवे बायको क्षणात ओळखते. मग ते मद्यपान असो वा केवळ पान असो! एवढेच नाही तर तुम्ही कोठे गेला होता हे ही ती ओळखते!!! (कृपया चांगल्या अर्थानेच वाचा)
मात्र गंधक्षमता वा गंधज्ञान केवळ माणसालाच असते असे म्हटले तर तुम्ही मला वेढ्यात काढून माझ्या बुद्धीची लांबी, रुंदी व खोली ओळखून पुढे हा लेख वाचणारही नाहीत एवढा माझा तुमच्यावर विश्वास आहे. . . . !!
याला म्हणतात विश्वास! !
मित्रांनो गंधज्ञानाची व एकंदरीत ज्ञानेंद्रियांची ही दुनिया फारच निराळी आहे. . . .
मानव व इतर प्राणी ज्ञानेंद्रियांद्वारे जगाचे ज्ञान अनुभवतात. एखादे ठराविक ज्ञानेंद्रिय एखाद्या ठराविक प्राण्यात अधिकच तिक्ष्ण असते. उदाहरणार्थ घार किंवा गिधाडासारख्या पक्षाची दृष्टी अत्यंत तिक्ष्ण असते. हे पक्षी जवळपास तीन किलोमीटर अंतरावरील उंदीर अथवा सस्यासारखे प्राणी टिपू शकतात! म्हणजे हे असे आहे की आपण इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून मुंगी पाहू शकतो!!!
वटवाघळे श्रवणात अत्यंत तिक्ष्ण असतात. लहानात लहान आवाज जो आपल्याला ऐकूही येत नाही तो ते ऐकतात व अति तिवृतेचा आवाज जो आपल्या कानांना सहनही होत नाही तोही ते ऐकू शकतात! सापासारखे प्राणी आपल्या जिभेचा वापर केवळ चविसाठी नाही करत तर ते जिभेने गंध घेऊन अन्न व शिकारी सोबतच शत्रुचेही स्थानही समजून घेतात! ते आपल्या प्रियकराला वा प्रेयसीला मिलनेच्छा गंधाने कळवतात व समजतात! ! हत्ती आपली सोंड हात म्हणून तर वापरतोच मात्र वास्तविक पाहता ते त्याचे नाक असते जे अत्यंत तिक्ष्ण असते. पृथ्वीवरील सर्वात लांब नाकाचा प्राणी असे त्याला म्हटले तर त्यात काही गैर नाही!!
मुंगीसारखा छोटा जीव गंध ज्ञानाद्वारे अन्नासोबतच आपले सहकारी मित्र शोधते व अगदी सैनिकी शिस्तीत चालणे, अन्न गोळा करणे व बांधकाम करणे अशी कामे करते. निरंतर उद्योगी मुंगी मिलेटरी शिस्तीत एकसंघपणे व कौशल्याने आपले काम करते!!
आपल्याला टाळ्या वाजवायला लावणारा किटक? ?? हं, डास. . त्याचे गंधज्ञान अत्यंत अप्रतिम आहे. कितीही अत्तर, डिओड्रंट व परफ्युमचा वापर केला तरी त्याला चकवा देता येत नाही उलट तोच आपल्याला चकवा देतो! !
या सर्व स्पर्धेत या सर्वांना मागे टाकतो तो कुत्रा.. कुत्र्याची गंध क्षमता माणसाच्या 44 पट अधिक आहे! ! तो त्याच्या हद्दीत आलेला कुत्रा त्याच्या मुत्राच्या गंधाने ओळखतो!! त्याच्या याच विलक्षण क्षमतेचा उपयोग आपण माणसे आपल्या फायद्यासाठी प्राचीन काळापासून घेत आलेले आहोत. निसर्गाची रचना आपल्या कल्पनेपलीकडील आहे. वरवर पाहता सारखेच वाटणारे झेब्रे, सारखे नसतात! ! प्रत्येक झेब्र्याच्या शरिरावरील पट्टे भिन्न भिन्न असतात! जसे आपल्या अंगठ्याचे ठसे भिन्न भिन्न असतात! आपले जसे ठसे भिन्न असतात तसेच शरिराचे वासही भिन्न असतात! कोणत्याच एका माणसाच्या शरिराचा गंध हा दुस-या माणसाच्या शरिराच्या गंधासारखा नसतो! कुत्रा एवढा अवलिया प्राणी आहे की तो गंधावरून भावना ओळखतो!! अर्थात आपला मुड कसा आहे? हेतू काय आहे? घाबरलेला माणुस, धिट माणुस, जिवंत माणुस व मृत माणुस तो गंधावरून ओळखतो! म्हणूनच गुन्हे अन्वेषणात संबंधीत यंत्रणा त्याचा खुबीने वापर करून घेतात. अपघातात मदत व बचाव पथके, जखमी व मृत अपघात गस्तांना शोधून काढण्यात कुत्र्याची अर्थात श्वानपथकाची मदत घेतात. आता तर संशोधक कुत्र्याला प्रशिक्षण देवून मानवी शरिरातील कर्करोगाच्या पेशी शोधण्यात त्याची मदत घेणार आहेत म्हणे! ! बर्फाळ प्रदेशात बर्फाखाली गाडले गेलेले मृतदेह शोधण्यात कुत्र्याची मदत होते ती त्याच्या गंध क्षमतेमुळेच!!
बरे हे झाले मानवासह इतर प्राणीमात्रांचे गंधज्ञान. . मात्र निसर्गाची अदभूत किमया एवढ्यावरच संपत नाही, वनस्पतींना देखील गंधज्ञान आहे! ! नाक नाही तरी! !! पिकणारी फळे गंधाद्वारे इतर फळांना पिकण्याचा संदेश देतात! पाने जर आपल्यावर आळ्यांनी हल्ला केला तर इतर पानांना गंधाद्वारे धोक्याची सुचना देतात! मग इतर पाने आपल्यातील ठरावीक रसायने स्त्राव स्वरूपात बाहेर सोडतात!! अमरवेल नावाची परजीवी वनस्पती आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. मृतदेहाचे अथवा इतर जिवंत वनस्पतीचे देहाचे शोषण करून जगणे हे तीचे वैशिष्ट्ये. कारण ती परजीवी अर्थात स्वतःचे अन्न स्वतः तयार न करू शकणारी वनस्पती आहे. तिच्या पानांमध्ये हरितद्रव्य (क्लोरोफिल) नसते. ही वनस्पती आपल्या आसपास पिकलेल्या टमाट्यांचा गंध ओळखून त्यांच्याकडे आकर्षित होते! !
आहे की नाही निसर्गाची किमया अदभूत आणि अविश्वसनीय? ? शेवटी एवढेच की नाक केवळ आपल्यालाच आहे असे नाही आणि ते केवळ नथीसाठीच आहे असेही नाही. . . . . .
लेखन :
बालासाहेब सिताराम धुमाळ
मो. 9096877345 / 9673945092

No comments:
Post a Comment