भटके विमुक्त हक्क परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी श्री दिलीप परदेशी....
विभागीय युवा आघाडी अध्यक्षपदी श्री. नागेश जाधव व सोलापुर जिल्हा अध्यक्षपदी श्री. किसनराव सरोदे यांची नियुक्ती-- प्रा धनंजय ओंबासे
पुणेः दि. 8
महाराष्ट्र जोशी समाज समितीच्या माध्यमातून जोशी, गोंधळी, वासुदेव, बहुरुपी, चित्रकथी, मेढंगी, सरोदी या व अशा इतर भिक्षेकरी समाजाच्या विविध समस्यांना वाचा फोडत असलेले तसेच या समाजाचे प्रश्न शासन प्रशासनाकडून सोडवत असलेले पुण्याचे श्री. दिलीप परदेशी यांची भटके-विमुक्त हक्क परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे.
काल दिनांक ८ ऑक्टोबर, रोजी कृष्ण सुंदर लॉन्स, एरंडवणे, पुणे येथे "महाराष्ट्र जोशी समाज समिती" च्या वतीने आयोजित 33 व्या वधू-वर परिचय मेळाव्यात भटके-विमुक्त हक्क परिषदेच्या कोअर टिमच्या मान्यतेने हक्क परिषदेचे प्रदेश अध्यक्ष प्रा. धनंजय ओंबासे,प्रदेश सचिव प्रा. सखाराम धुमाळ, प्रदेश प्रवक्ते श्री. बाळासाहेब धुमाळ, उद्योग आघाडीचे अध्यक्ष श्री. नंदकुमार गोसावी, युवा आघाडीचे अध्यक्ष श्री. प्रतिक गोसावी, ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री. भिमराव इंगोले यांनी नेमणूक पत्र देऊन श्री. दिलीप परदेशी यांची पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. याचवेळी पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा आघाडी अध्यक्ष म्हणून बारामतीचे तरुण तडफदार युवा समाजसेवक श्री. नागेश जाधव यांची तर सोलापूर जिल्हाध्यक्षपदी धडाडीचे समाजकर्मी श्री. किसनराव सरवदे यांची नियुक्ती करण्यात आली. सातारा जिल्हा अध्यक्ष पदी श्री. राजेंद्र बोडरे यांना नेमण्यात आले.
सदर कार्यक्रमात जोशी समाज समितीकडून हक्क परिषदेचे अध्यक्ष प्रा. धनंजय ओंबासे यांच्या समाज संघटन कार्याचा गौरव सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना हक्क परिषदेचे अध्यक्ष प्रा. धनंजय ओंबासे म्हणाले की, " मागील 35 वर्षे जोशी व इतर भिक्षेकरी समाजासाठी अविरतपणे काम करणारे सच्चे समाजसेवी श्री. दिलीप परदेशी यांचा अनुभव, उत्साह, मार्गदर्शन, परखडपणा, जिद्द, चिकाटी व संवेदनशीलता तसेच संघटन कौशल्य यांची नोंद घेऊन त्यांच्यावर भटके-विमुक्त हक्क परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
" सर्व 52 भटके विमुक्त जमातींचे प्रभावी संघटन करुन शासन प्रशासनाकडून या समाजाला सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय न्याय मिळवून देण्यासाठी मी माझे सर्वोत्तम योगदान देईल अशी प्रतिक्रिया श्री. दिलीप परदेशी यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. या निवडीबद्दल संपूर्ण भटके-विमुक्त समाजाकडून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे
बाळासाहेब धुमाळ.
प्रवक्ता व प्रसिद्धी प्रमुख
भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र राज्य
मो. 9421863725