(अति महत्वाचे)
प्रेस नोट
भटके विमुक्त हक्क परिषदेच्या वतीने आयोजित अंबरनाथ येथील शिधावाटप कार्यालयावरील मोर्चा तूर्तास #स्थगित.
-----------------------------------------------------------------
अंबरनाथ, 16 ऑक्टोबर
अंबरनाथ जि. ठाणे येथील भटके विमुक्त नाथपंथी डवरी गोसावी व इतर भटके-विमुक्त तसेच आदिवासी मागासवर्गीय रेशनकार्ड धारक रितसर लाभार्थी आहेत. मात्र तरीही त्यांना शिधावाटप कार्यालयाकडून अन्नधान्याचे वाटप होत नाही. लाभार्थ्यांची कार्ड्स रद्द करण्यात आली आहेत.
या विरोधात उद्या दिनांक 17 ऑक्टोबर रोजी भटके विमुक्त हक्क परिषद व नाथपंथी डवरी गोसावी भटके-विमुक्त सेवा संस्था अंबरनाथ यांचे वतीने अंबरनाथ येथे सर्कस मैदानापासुन पुरवठा कार्यालयावर भव्य मोर्चा काढून सदर अन्याया विरोधात आंदोलन करण्यात येणार होते. मात्र आज दिनांक 16 ऑक्टोबर रोजी हक्क परिषदेचे अध्यक्ष श्री. धनंजय ओंबासे, युवा शाखेचे राज्य सचिव श्री. प्रतिक गोसावी आणि हक्क परिषदेचे ठाणे जिल्हाध्यक्ष श्री. भिमराव इंगोले यांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा. गिरीश बापट यांची या पार्श्वभूमीवर मंत्रालयात भेट घेतली. होत असलेला अन्याय मंत्रिमहोदयांना समजून सांगीतला व यात आपण व्यक्तिशः लक्ष घालून होत असलेला अन्याय थांबवावा असे आवाहन करण्यात आले. मंत्री महोदयांना उद्याच्या प्रस्तावित आंदोलनाचीही कल्पना देण्यात आली. तेव्हा माननीय मंत्री महोदयांनी तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले आणि उद्याच्या उद्या सदर प्रश्न मार्गी लावण्याच्या कडक सूचना केल्या. उद्याच मला हक्क परिषदेच्या नेतृत्वाकडून सदर प्रश्न सुटल्याचा फोन कॉल आला पाहिजे अशा शब्दात अधिकार्यास सुनावले.
उद्याच बंद करण्यात आलेली रेशन कार्ड्स सुरू करून द्यावीत व पूर्ववत अन्नधान्याचा पुरवठा सुरू करावा असेही मंत्र्यांनी सांगितले. त्यासाठी उद्याच ठाणे जिल्हा अन्नधान्य पुरवठा कार्यालयाच्या संबंधित अधिका-यांसोबत हक्क परिषदेच्या कार्यकर्त्यांची सकाळी 11:00 वाजता बैठकही निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे हक्क परिषदेने पुकारलेले उद्याचे आंदोलन तूर्तास #स्थगित करण्यात येत आहे याची सर्व अंबरनाथ तसेच परिसरातील आंदोलक कार्यकर्त्यांनी व समाज बांधवांनी नोंद घ्यावी.
पोटापाण्याचा प्रश्न गांभीर्याने घेऊन तातडीने मार्गी लागल्यामुळे अंबरनाथ येथील भटके विमुक्त आदिवासी मागासवर्गीय लाभार्थी समाजबांधवांना दिलासा मिळाला आहे. त्याबद्दल मंत्री महोदय माननीय गिरीश बापट व संबंधित विभागाचे ओ. एस. डी. श्री. शेख साहेब यांना भटके विमुक्त हक्क परिषद मनःपूर्वक धन्यवाद देते......
(बाळासाहेब धुमाळ)
प्रवक्ता तथा प्रसिद्धीप्रमुख
भटके विमुक्त हक्क परिषद म. रा.
मो. 9673945092.

No comments:
Post a Comment